नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; केंद्र सरकारतर्फे दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चार दिवसीय राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. बुधवारी (दि. २७) क्रीडा आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार असल्याची माहिती क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शहरातील तपोवनमधील कुंभमेळा मैदान येथे १२ ते १६ जानेवारी रोजी हा युवा महोत्सव पार पडणार आहे. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आणि राज्य शासनाच्या सहाय्याने देशातील प्रतिभावान तरुणाईला राष्ट्र उभारणीसाठी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यादृष्टीने सुरक्षिततेचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी (दि. २६) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्राथमिक बैठक घेत सूचना दिल्या आहेत.

साडेसात हजार युवक-युवतींचा सहभाग

युवा महाेत्सवासाठी नाशिक शहरात देशभरातून ७५०० हून अधिक युवक-युवतींचा हा सहभाग असणार आहे. यामध्ये देशातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीचा आस्वाद नाशिककरांना मिळणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव appeared first on पुढारी.