नाशिकमध्ये 5G सेवा सुरू, किती येणार खर्च?

5 G, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहुप्रतीक्षित ५ जी सेवा रिलायन्सच्या जिओ कंपनीने नाशिकमध्ये सुरू केली आहे. अशी सेवा सुरू करणारी रिलायन्स पहिली कंपनी ठरली आहे. या सेवेमुळे जिओ वापरकर्त्यांना वन जीबीपीएस प्लस स्पीडसह मर्यादित ५ जी डेटाचा आनंद घेता येणार आहे. याकरिता कोणताही अतिरिक्त खर्च लागणार नाही हे विशेष.

जिओ ही एकमेव अशी कंपनी आहे जिने ४ जी नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टॅण्डअलोन ट्रू ५ जी नेटवर्क तैनात केले आहे. स्टॅण्डअलोन ट्रू ५ जीसह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देणार आहे. त्यामध्ये लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन टू मशीन कम्युनिकेशन, ५ जी व्हाइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लायसिंग आदी. दरम्यान, ही सेवा मिळविण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिमकार्ड बदलण्याची गरज पडणार नाही. ग्राहकांना एक जिओ ५ जी नेटवर्क सुसंगत ५ जी हॅण्डसेट, राहत्या, कामाच्या ठिकाणी ५ जी नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी २३९ किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये 5G सेवा सुरू, किती येणार खर्च? appeared first on पुढारी.