नाशिक : अश्वाला विष खाऊ घालून मारले, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

crime www.pudhari.news

नाशिक : तबेल्यामध्ये बांधलेल्या अश्वाला विषारी पदार्थ खाण्यास देत त्याला मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अश्वमालकाने भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

सुलताना जाकीर शेख (रा. वडाळा रोड) यांच्या फिर्यादीनुसार, खडकाळी परिसरातील तबेल्यात त्यांनी त्यांच्याकडील अश्व बांधलेला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने दि. २७ ते २८ मार्च दरम्यान, सुलताना यांचे आर्थिक नुकसान व्हावे यासाठी काहीतरी विषारी पदार्थ खाऊ घालून अश्वाला जिवे मारले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुलताना यांनी भद्रकाली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अश्वाला विष खाऊ घालून मारले, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल appeared first on पुढारी.