नाशिक : ..आणि शिक्षकच निघाला मोबाइलचोर, सीसीटीव्हीत प्रकार कैद

mobile theft

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई नाका परिसरातील अधीक्षक, माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नांदगाव येथील खासगी शाळेतील उपशिक्षक संशयित रवींद्र पवार याने मोबाइल चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महिला कर्मचाऱ्याचा मोबाइल चोरतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दोन दिवसांपासून माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे बँक खाते शालार्थमध्ये अद्ययावत करण्याचे काम मुंबई नाका येथील वोक्हार्ट हॉस्पिटलसमोर असलेल्या अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी या कार्यालयात सुरू आहे. यामध्ये शुक्रवारी (दि. १६) नांदगाव येथील भागाबाई वामन हिरे माध्यमिक विद्यालय, कळमदरी या शाळेचे उपशिक्षक संशयित रवींद्र पवार यांनी वरिष्ठ लिपिक असलेल्या महिलेचा मोबाइल चोरला. हे सर्व प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने तत्काळ माध्यमिक वेतन निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुंबई नाका पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : ..आणि शिक्षकच निघाला मोबाइलचोर, सीसीटीव्हीत प्रकार कैद appeared first on पुढारी.