नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे

कविता राऊत पुतळा pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

मविप्र संस्थेने पुढाकार घेऊन कविता राऊत यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी प्रेरणा देणारा हा क्षण असून कविताने महाराष्ट्र व नाशिकचे नाव मोठे केले असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, उपक्रम व पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात धावपटू कविता राऊत यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आयएमआरटी महाविद्यालयात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. आर. के. बच्छाव, ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, प्रविण जाधव, विजय पगार, अर्जुन टिळे, उदय सांगळे, स्वाती भामरे, आदी उपस्थित होते.

दादाजी भुसे यांनी पुढे बोलतांना कष्ट आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण म्हणजे कविता राऊत आहे. मविप्र संस्थेने पुढाकार घेऊन एक स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी सुरु करावी. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेळात प्राविण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे एक व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यासाठी शासन पातळीवरून मान्यता व निधीसाठी पुढाकार घेऊ. जिल्हा नियोजन व डीपीडीसी मधून निधीची तरतूद करू असे आश्वासन दिले. नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात मविप्र संस्थेचे अग्रेसर मार्गक्रमण सुरु असून त्यांच्या कार्यामुळे शिक्षण क्षेत्राला दिशा मिळत आहे. अध्यक्षीय मनोगतात सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी कविता राऊत हि नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आयडॉल आहे. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नाविन्य मिळवावे. शासकीय पातळीवर खेळाडूंसाठी भरपूर नोकऱ्या असून विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून बघावे. मविप्र मॅरेथॉन राज्य व राष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाली असून येत्या २-३ वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संस्थेच्या माध्यमातून रेडीओ केंद्र उभारण्यात येईल. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सव, जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने एकमताने कविता राऊत यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचे ठरवले. कविताने प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल व यातून नवीन खेळाडू निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविकात क्रीडा अधिकारी प्रा हेमंत पाटील यांनी कविता राऊत हिचा प्रवास कथन केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे शिल्पकार अविनाश आडके, तुषार कटारे, विजय काळे यांना गौरविण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. अजित मोरे, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. दौलत जाधव उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : कविता राऊत यांचा पुतळा क्रीडापटूंसाठी प्रेरणा: दादा भुसे appeared first on पुढारी.