नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी

कृषिथॉन नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाखो रुपयांच्या कारमधून उतरलेला ग्राहक आलिशान हॉटेल मध्ये गेल्यास ५०० रुपये प्लेट कांदा भजी खातो. मात्र त्याच काद्यांला शेतकऱ्यास २ रुपये किलो भाव मिळालेला असतो. त्याचप्रमाणे शेतकरी व त्याच्या कुटूबियाने काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकालाही ग्राहकांकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान हाेते. ज्यावेळी ग्राहकांची मानसिकता बदलले त्यावेळी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

ठक्कर डोम येथे आयोजित कृषिथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ना. भुसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, देविदास पिंगळे, नाडाचे अध्यक्ष विजय पाटील, अश्विनी न्याहारकर, पंजाब माजी नगरसेवक प्रविण तिदमे, शाम साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते निश्चितपणे आपण सगळेजण मिळून करूया. राज्य आणि देश पातळीवर विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याची प्रगती असून फळ, फुल, भाजीपाल्याची निर्यातीत आधुनिक शेती कास धरून शेतकरी बांधव त्या ठिकाणी राब राब राबतोय. त्या जोडीला राज्य सरकारच्याही अनेक योजना असून त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळण्यासाठी नागरिकांनी सर्व समाजाने पुढे यावे. शेतकऱ्याच्या कष्टाला त्याच्या कामाला आपण माणूस म्हणून न्याय दिला पाहिजे. पहाटेपासून शेतकरी सहकुंटूब राबतो. हे करत असताना त्यास निसर्गासह वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यातूनही पिक वाचलेच तर पिकाला दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांना सढळ हाताने आपण सहकार्य केलं पाहिजे अशी भावना जोपर्यंत आमच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत शेती क्षेत्राचा न्याय निवाडा होऊ शकणार नाही, असे ना. भुसे म्हणाले.

कृषिथॉनचे आयोजन साहिल न्याहारकर यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून कृषीथॉन नाशिक मध्ये होत असून त्यात ४५ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तसेच ३०० हुन अधिक नामांकित कंपन्यांचे स्टॉल येथे आहेत. खा. गोडसे म्हणाले की, या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती मिळत असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी क्षेत्रात चांगल उत्पादन कसे करावे याची माहिती शेतकऱ्यांना मिळते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले.

हेही वाचा :

The post नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी appeared first on पुढारी.