नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार

ओझर www.pudhari.news

ओझर :  पुढारी वृत्तसेवा 

येथील मुंबई आग्रा महामार्गावर छत्रपती शिवाजीमहाराज चौक सायखेडा फाट्याजवळ असलेल्या विठ्ठल कॉम्प्लेक्स मधील कॅनरा बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यानी फोडले.

ओझरहून नाशिककडे जाताना डाव्या बाजूस कॅनरा बँकेची शाखा आहे. त्याला लागूनच एटीएम सेंटर देखील आहे. शनिवार (दि.8) मध्यरात्री तीनच्या सुमारास तोंडाला मास्क लावून दोन चोरट्यांनी मशीन फोडले. आधी एक जण आत शिरला आणि काही वेळाने बाहेरची परिस्थितीचा अंदाज घेऊन दुसऱ्याने आत प्रवेश केला. त्यांनी हातातील लोखंडी वस्तूच्या आधारे मुख्य दार फोडले. परंतु त्यांना मशीनमध्ये रक्कम सापडून आली नाही. दरम्यान सकाळच्या सत्रात एक ग्राहक जेव्हा पैसे काढायला गेला तेव्हा त्याला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर स्थानिक जागा मालकांनी बँकेच्या व्यवथापकांना संपर्क केला. त्यानंतर सबंधित अधिकारी आल्यानंतर पोलिसांनी इतर बाबी तपासल्या आहेत. त्यात सीसीटिव्ही फुटेज देखील तपासून ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी (दि.9) सकाळी उशिरा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. दरम्यान या बाबत स्थानिक प्रबंधक तृषिता आचार्य यांच्याशी अधिक माहिती घेतली असता त्यांनी मशीनचे मोठे नुकसान झाले असून बँक एटीएम मध्ये किती रक्कम होती आणि मधल्याकाळात किती रक्कम काढली गेली. याचा तपशील लवकरच मिळेल असे सांगितले. ओझर पोलिसांनी सदरचा परिसर सील केला असून पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार appeared first on पुढारी.