नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर

निवडणूक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हयातील बाजारसमित्यांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता बाजारसमित्यांची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. या यादीनुसार 14 बाजारसमित्यांसाठी 30 हजार 498 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील 31 डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 286 सह नाशिक जिल्हयातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर केल्या. त्यामुळे रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.

प्राधिकरणाने जाहीर केलल्या कार्यक्रमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी 14 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्या. त्यानंतर, याद्यावर 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या. प्राप्त झालेल्या हरकतींवर 2 डिसेंबर पर्यंत सुनावणी प्रक्रीया पार पडली. हरकतींवरील सुनावणी प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी जिल्हयातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी या बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी त्या-त्या तालुक्यातील बाजार समितीच्या आवारात प्रसिध्द झाली. यामध्ये मालेगाव बाजारसमितीत सर्वाधिक 4 हजार 218 तर सुरगाणा बाजारसमितीत सर्वात कमी 360 मतदार आहेत.

डॉक्टरांच्या अखंड सेवेमुळेच कोविड महामारीवर विजय : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

निवडणूक प्रक्रिया प्रारंभ : २३ डिसेंबर

अर्ज दाखल : २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर

मतदान : २९ जानेवारी

बाजार समिती मतदार संघनिहाय एकूण मतदार

तालुका मतदारसंघ.. सहकारी संस्था.. ग्रामपंचायत.. व्यापारी.. आडते हमाल मापारी… एकूण

 

देवळा : 510… 352… 437… 96.. 1 हजार 395

 

घोटी बु : 713… 835… 491… 231… 2 हजार270

 

मालेगाव : 1 हजार 585… 1 हजार247… 1 हजार124… 262… 4 हजार 218

 

दिंडोरी : 720… 637… 459… 50… 1 हजार 866

 

लासलगाव : 777… 569… 542… 397… 2 हजार285

 

नाशिक : 1 हजार365… 767… 1 हजार48… 158… 3 हजार338

 

सुरगाणा : 355… 000… 5… 000… 360

 

नांदगाव : 623… 560… 356… 112… 1 हजार651

 

सिन्नर : 1 हजार339… 1 हजार 68… 171… 352… 2 हजार930

 

पिंपळगाव ब. : 1 हजार47… 653… 712… 374… 2 हजार 786

 

चादंवड : 1 हजार 12… 836… 319… 109… 2 हजार276

 

मनमाड : 294… 209… 147… 135… 785

 

येवला : 1 हजार 48… 832… 423… 353… 2 हजार 656

 

कळवण : 499… 565… 406… 112… 1 हजार 582

 

एकूण : 11 हजार887… 9 हजार130… 6 हजार640… 2 हजार 741… 30 हजार

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर appeared first on पुढारी.