नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कोटमगाव-हिंगवणे परिसरात घडली. या अपघातात आशिष जयराम वलवे (२१, रा. गंगापाडळी, लाखलगाव) याचा मृत्यू झाला.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, संशयित टेम्पोचालक रामेश्वर विक्रम राठोड (३१, रा. देवळाली गाव) हे रविवारी (दि.२८) सायंकाळी ७.३० वाजता भरदाव टेम्पो चालवून आशिषच्या दुचाकीस धडक दिली. त्यात टेम्पोचे चाक आशिषच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.