नाशिक : दारूच्या नशेत 16 कारच्या काचा फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड

कारच्या काचा फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड,www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

त्रिमूर्ती चौकातील हेडगेवारनगरमध्ये मंगळवारी (दि. 11) मध्यरात्रीच्या सुमारास 16 कारच्या काचा फोडणाऱ्या दोन्ही आरोपींची धिंड पोलिसांनी परिसरातून काढली.

मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास त्रिमूर्ती चौकाजवळ हेडगेवारनगरमध्ये दोन आरोपींनी दारूच्या नशेत कोयता व धारदार शस्त्राने परिसरात दहशत पसरवित, घरांसमोर उभ्या असलेल्या कार, रिक्षाची तोडफोड केली होती. यावेळी एका नागरिकाने या दोघांना हटकण्याचा प्रयत्न केला असता, या गावगुंडांनी त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले यांनी अर्ध्या तासात संशयित जयेश भालेराव (20) आणि सूरज चव्हाण (19) यांना जेरबंद केले होते. अंबड पोलिसांनी भालेराव आणि चव्हाण या दोघांची धिंड परिसरातून काढली.

हेही वाचा :

The post नाशिक : दारूच्या नशेत 16 कारच्या काचा फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड appeared first on पुढारी.