नाशिक पोलिस झोपले होते का? ‘त्या’ प्रकरणावरुन दानवेंचा सवाल

अंबादास दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; या आधी अफू, गांजाच्या शेती उघडकीस यायच्या. आता एमडी बनवण्याचे कारखानेच समोर आल्याने त्यास कोणाचा आशीर्वाद आहे हे तपासावे लागेल. ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. यात राजकीय लागेबांधे आहे का तेदेखील तपासावे. नाशिक पोलिसांना कारखान्याची माहिती नसल्याने ते झोपले होते का? पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी. अशी परखड प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

दानवे हे आज नाशिक दौ-यावर आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी
मराठा आरक्षणाबाबत सरकारने ४० दिवसांचे आश्वासन दिले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाची दखल घेतली की नाही, तसेच सरकार त्यांचे आश्वासन पाळते की नाही, हे येत्या काही दिवसांत समजेल. मात्र सरकारने आरक्षणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू भयावह आहेत. मानवी चुका तसेच सरकारच्या बेपर्वाईमुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक पोलिस झोपले होते का? 'त्या' प्रकरणावरुन दानवेंचा सवाल appeared first on पुढारी.