नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं

रौलेट,www.pudhari.news

नाशिक  (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील धारणगाव येथे बिंगो रौलेट जुगारातून तरुणाची ३६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आचल चौरसिया, रमेश चौरसिया (रा. मुंबई), कैलास शहा, गणेश एकनाथ दिंडे (दोघे रा. नाशिक), अमोल कपिल (रा. अकोले, जि. अहमदनगर) यांच्याविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी शुभम सुनील शेळके (रा. धारणगाव, ता. निफाड) यांनी फिर्याद दिली आहे. ऑनलाइन बिंगो गेम खेळल्यास झटपट पैसे दाम दुप्पट होतात, असे संशयितांनी विश्वासाने सांगून आमिष दाखवत फिर्यादी शेळके यास ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळण्यास भाग पाडले. संशयितांनी दिलेला विश्वास आणि पैशाच्या आमिषामुळे फिर्यादीने वेळोवेळी गणेश दिंडे व अमोल कपिले यांच्या सांगण्यावरून राहुल गोतरणे, संतोष चव्हाण यांच्या फोन पे वर ऑनलाइन बिंगो रोलेट सायबर गेम खेळण्यासाठी वेळोवेळी पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर केले. यात अंदाजे ३६ लाख ८० हजार रुपये या ऑनलाइन बिंगो गेममध्ये पैसे पाठवल्यानंतर फसवणुकीचा अंदाज आल्याने त्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

झटपट पैसे कमावण्याच्या नावाखाली तरुणांना बिंगो रौलेट या ऑनलाइन जुगाराचे व्यसन लावले. त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात बिंगो रौलेट जुगाराने पाळेमुळे रुजवली आहेत. त्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : बिंगो गेम पडला 36 लाखांना, तरुणाला फसवलं appeared first on पुढारी.