नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात लूटमार, मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल मच्छिंद्र पवार (२७, रा. गंगापूर गाव) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल विरोधात गंगापूर, मुंबई नाका, पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबरी चाेरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात या आधीही प्रतिबंधात्मक कारवाई केली तरीदेखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा:

The post नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध appeared first on पुढारी.