नाशिक : सिडकोचे तत्कालीन प्रशासक ठाकुर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

न्यायालय

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर येथील ज्ञानेश्वर सोनवणे प्रकरणात दिनांक 20 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने आम्हाला जामीन देऊन न्याय दिलेला आहे.  पुढील आठवड्यात मी माझ्या वकिला समवेत माझ्यावर झालेल्या अन्याय बाबत माहिती देणार आहे, अशी माहिती सिडकोचे तत्कालीन प्रशासक घनश्याम ठाकूर यांनी दिली आहे.

सिडको प्रशासनाचा प्लॉट महापालिकेकडे हस्तांतरित झाला असताना देखील तत्कालीन सिडको प्रशासकाने पदाचा गैरवापर करत दोघांच्या मदतीने कागदपत्रांवर खाडाखोड करून प्लॉटची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तत्कालीन सिडको प्रशासक घनश्याम ठाकूर यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात ते न्यायालयात गेले असता न्यायालयाने  त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता.

नाशिक येथील सिडको प्रशासकीय कार्यालयातील तत्कालीन प्रशासक घनश्याम ठाकूर, लिपिक हर्षद खान यांनी गैर मार्गाने कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून, संगणमत करून कोणताही अधिकार नसताना राणेनगर येथील स्वामी विवेकानंद पुतळ्याशेजारील सिडकोचा सर्वे नंबर ९२९ सेक्टर १४ बी नेबरहूड मार्गशीर पॉकेट क्रमांक बी १४ येथील ३७५९ चौरस मीटरचा प्लॉट ज्ञानेश्वर बाबुराव सोनवणे यांना परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी न्यायालयात झाली असता न्यायालयाने तत्कालीन प्रशासक यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने दिनांक 20 एप्रिल रोजी जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : सिडकोचे तत्कालीन प्रशासक ठाकुर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा appeared first on पुढारी.