पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद

Water Cut pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामे, अमृतमणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, अन्य एका जलवाहिनीची दुरुस्ती ही कामे बुधवार (दि.२७) रोजी केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील सातपूर, नाशिक पश्चिम आणि सिडकोतील जवळपास १२ प्रभागातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

शहरातील निम्म्या भागात बुधवार (दि.२७) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी (दि.२८) रोजी सकाळी या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. एक, दीड महिन्यापासून महानगरपालिका वेगवेगळ्या भागात दुरुस्ती व काही कारणांमुळे पाणी पुरवठा बंद ठेवत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट पाणी कपात न करता अघोषित पाणीकपात करण्यात येत आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. सातपूर विभागात पाणी पुरवठा विभागाशी संबंधित विविध स्वरुपाची कामे तातडीने करणे आवश्यक झाले असून बुधवारी (दि.२७) रोजी पाणी पुरवठा बंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. दुरुस्ती कामांमुळे सातपूर विभागातील सर्व प्रभागात पाणी पुरवठा बंद राहील.

येथे पाणीपुरवठा राहणार बंद
प्रभाग क्रमांक ८, ९, १०, ११, २६ आणि २७ मधील चुंचाळे, दत्तनगर, माऊली चौक परिसराचा यामध्ये समावेश आहे. नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिंग होम, आकाशवाणी केंद्र परिसर, तिरुपती टाऊन, सहदेवनगर, सुयोजित गार्डन, आयचितनगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांती निकेतन व परिसर, प्रभाग १२ मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांतीनगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुलनगर, मिलिंदनगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल, तुपसाखरे लॉन्स, मातोश्री नगर, सहवासनगर, कालिकानगर, गडकरी चौक, गायकवाड नगर परिसर तसेच सिडकोतील प्रभाग २५ मधील इंद्रनगरी, कामठवाडा, धन्वंतरी रुग्णालय महाविद्यालय, महालक्ष्मीनगर, दत्तनगर, मटालेनगर, प्रभाग २६ मधील शिवशक्ती नगर, आयटीआय पुलाजवळील परिसर, बॉम्बे टेलर परिसर, प्रभाग २७ मधील चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबानगर, अंबड मळे परिसर आणि प्रभाग २८ मधील खुटवडनगर, माऊली लॉन्स, वावरेनगर, अंबड गाव, महालक्ष्मी नगर या परिसरात बुधवारी (दि.२७) रोजी सकाळी नऊनंतर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर गुरुवारी (दि.२८) रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

हेही वाचा:

The post पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद appeared first on पुढारी.