पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे सोने केले लंपास

सोने

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवासोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून चकाचक करून देतो, असे सांगून दोन भामट्यांनी महिलेचे तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. नितीन गोयल (प्लॉट ८, राज्य कर्मचारी सोसायटी, अशोकनगर) येथे शुक्रवारी (दि. १५) सकाळी प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन्ही भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन भामटे राज्य कर्मचारी सोसायटीत येऊन त्यातील एका भामट्याने घरात तर एक घराबाहेर दुचाकीजवळच उभा होता. पहिल्या भामट्याने घरात शिरून गोयल यांच्या आईचे चांदीचे पैंजण चकचकीत केले. आईस इतर दागिने मागत चेन, बांगड्या व इतर दागिने एका भांड्यात ठेवून ते गॅसवर ठेवण्यास सांगितले. भामट्याने घरातील आईची नजर चुकवून हे दागिने घेऊन तिथून फरार झाले. सीसीटीव्हीत दोन्ही भामटे दुचाकीवर जाताना कैद झाले आहेत. या घटनेनंतर या महिलेने चोरट्यांचा शोध घेतला परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, या घटनेप्रकरणी नितीन गोयल यांनी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी उबाळे करत आहे. 

हेही वाचा :

The post पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे सोने केले लंपास appeared first on पुढारी.