पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला

देवेंद्र फडणवीस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

प्रत्येक जिल्ह्यात आम्ही शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवतोय. पंरतु आज शासन राम दरबारी आले आहे. कधी कधी चांगल काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. पण, लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात, तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच आम्ही डॉ. एकनाथ शिंदे आणले. तरीही ज्यांच्या पचनी नाही पडलं त्यांच्यासाठी आता अजित पवार आणले असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, सरकारमध्ये आता तीन झेंडे आले आहेत. आम्हाला तिन्ही झेंडे घेऊन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर न्यायचा आहे.   लोकांना लाभ मिळतोय याची इतरांना पोटदुखी होतेय मात्र, इतरांच्या पोटदुखीवर आम्ही उपचार करु. सामन्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे हे सरकार आहे.

विकासाची गती वाढविण्यासाठी आम्ही तिघे मैदानात आलो आहे. आम्हाला राजकारण व अर्थकारण कळतं. त्यामुळे जे  निर्णय होतील ते सामन्य माणसाच्या हिताचे होतील. शेतक-यांना एक रुपयात विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. नमो शेतकरी योजना आणून थेट 12 हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात देणार आहोत. पुढच्या तीन वर्षात नाशिक मधील प्रत्येक शेतक-याला 12 तास दिवसा वीज मिळेल असे फडणवीसांनी आश्वस्त केले. तापी पुनर्भरण प्रकल्प करु आणि नाशिक दुष्काळमुक्त करु असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : 

The post पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला appeared first on पुढारी.