बलात्कारासाठी ‘आडोसा’ देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा

Crime News

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-त्र्यबंक रोडवरील लॉज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यासोबत असणाऱ्या संशयितास लॉजमधील खोली उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉज व्यवस्थापक व मालकासह पीडितेवर अत्याचार करणाऱ्याविरोधात विनयभंग, बलात्कार, पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कॅफेचालकांनी खाद्यपदार्थ विक्रीच्या बहाण्याने जाेडप्यांना ‘आडोसा’ उपलब्ध करून दिल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी शहरात ८ कॅफेचालकांविरोधात गुन्हे देखील दाखल आहेत. तसेच महानगरपालिकेनेही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षीततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. दरम्यान, त्र्यंबकरोडवरील लॉज मध्येही विना आधार कार्ड, ओळखपत्र न घेता तासिका तत्वावर जोडप्यांना खोली उपलब्ध करून दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. म्हसरुळ पोलिस ठाण्यात दाखल पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयित रोहित लोखंडे (२०, रा. ता. दिंडोरी) याने २०२१ पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख केली. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअपवर संपर्क साधून संशयित रोहितने मैत्री वाढवली. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे त्र्यंबकरोडवरील लॉजवर नेत अत्याचार केले. दरम्यान, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील संबंधित लॉज व्यवस्थापक व मालकाने लॉजमधील खोली संशयितास उपलब्ध करून देत त्यास गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप पीडितेने केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर म्हसरुळ पाेलिसांनी संशयित रोहितसह लॉज व्यवस्थापक व मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

The post बलात्कारासाठी 'आडोसा' देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा appeared first on पुढारी.