राज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक दौरा रद्द 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा नियोजित असलेला नाशिक जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यपाल दि. 26 व 27 रोजी नाशिक व अहमदनगर दौऱ्य़ावर येणार होते.

बैस यांचा पहिलाच नाशिक दौरा असल्याने यंत्रणांनी जय्यत तयारी केली होती. दोन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन, त्यानंतर पहिने गावाला भेट देऊन शालिमार येथील कालिदास कलामंदिरात नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी सांगता सोहळ्याला प्रमुख उपस्थितीती ते लावणार होते. त्यानंतर पंचवटीमधील श्री काळाराम मंदिर येथे बैस दर्शनासाठी जाणार होते. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती मात्र, राज्यपालांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post राज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक दौरा रद्द  appeared first on पुढारी.