वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास

कारावास www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाहतूक पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे कारावास व दीड हजारांचा दंड ठोठावला आहे. सुनील सुरेश साळुंके (३१, रा. प्रांजल सोसायटी, वृंदावननगर, आडगाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्याचे नाव आहे.

सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिस अंमलदार संदीप गिरिधर सोनवणे व नवनाथ वाल्मीक रोकडे हे महामार्गावरील जत्रा हॉटेल चौफुली येथे २२ आॅगस्ट २०२० रोजी सकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी सुनील साळुंके याने वाहतूक अंमलदार संदीप सोनवणे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच वर्दीही फाडली. यावेळी वाहतूक अंमलदार रोकडे आले असता, त्यांनाही शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी आडगाव पोलिसांत आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक आर. पी. कापले यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

सदरचा खटला जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती बावस्कर यांच्यासमोर चालला. त्यावेळी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सहायक अभियोक्ता अॅड. शिरीष कडवे यांनी सात साक्षीदार तपासले. यात आरोप सिद्ध झाल्याने आरोपी सुनील साळुंके यास न्यायालयाने दोन वर्षांचा साधा कारवास व दीड हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा :

The post वाहतूक पोलिसांना दमदाटी करणाऱ्यास दोन वर्षे कारवास appeared first on पुढारी.