शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त

कोल्हापूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात जिल्ह्याला टंचाईच्या तीव्र झळा बसत असून ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी जनता व्याकुळ होत असताना शासकीय यंत्रणा मात्र निवडणूकांच्या कामांमध्ये व्यस्त आहे.

येत्या आठवड्यात लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबत विविध स्तरा वर कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण यंत्रणा आता इलेक्शनच्या मानसिकतेत पोहचली आहे. अशावेळी जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययाेजनांकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे.

चालूवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर पाण्याचे संकट घोंगावते आहे. त्यातच धरणांची पाणी पातळीही खालावत आहे. सद्यस्थितीत प्रमुख २४ धरणां मध्ये 25 हजार ९६९ दलघफु म्हणजेच ३९ टक्के साठा शिल्लक आहे. आगामी काळात वाढत्या उन्हाच्या झळांचा धरणांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची सारी भिस्त ही प्रशासनावर अवलंबून असेल. मात्र, आठ दिवसांतच लोकसभेचा बिगूल वाजणार आहे. अशा परिस्थितीत किमान पुढील तीन महिने तरी यंत्रणा निवलाडणुकांच्या कामात व्यस्त असणार आहे. त्यामुळे यंत्रणांना जिल्ह्यातील टंचाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळणे अशक्यप्राय आहे. परिणामी ग्रामीण जनतेला पाण्यासाठी दाहीदिशा वणवण फिरण्याची वेळ ओढावणार आहे.

सध्या टँकरवरच भीस्त
जिल्ह्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीसोबत ग्रामीण भागाला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. आजमितीस सात तालूक्यातील १७४ गावे आणि ३८५ वाड्या अशा एकुण ५५९ ठिकाणी १७० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसकाठी टँकरच्या ३५८ फेऱ्या मंजूुर असताना प्रत्यक्षात ३५९ फेऱ्या होत आहे. तसेच पाण्यासाठी प्रशासनाने ५२ विहिरीही अधिग्रहित केल्या आहेत. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात वाढत्या ऊन्हाच्या कडाक्यासोबत टँकरच्या फेऱ्यातदेखील भर पडणार आहे.

हेही वाचा:

The post शासकीय यंत्रणा निवडणूकीत व्यस्त; जनता पाणी टंचाईने त्रस्त appeared first on पुढारी.