शेअर मार्केटच्या नावाने सॉफ्टवेअर इंजिनियरला ४७ लाखांचा गंडा

शेअर मार्केट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरसह इतर दोघांना तब्बल ४७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी कॉलेजरोडवरील ३४ वर्षीय अभियंत्याने सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभियंत्याच्या फिर्यादीनुसार, त्याच्यासह इतर दोन गुंतवणूकदारांची २० सप्टेंबर २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ४७ लाख १२ हजार ५४९ रुपयांची फसवणूक झाली. अभियंत्यासोबत संशयितांनी संपर्क साधून त्यास शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमीष दाखवले. त्यासाठी त्यांनी अभियंत्यास विश्वास बसावा यासाठी गुंतवलेल्या पैशांवर चांगला नफा मिळाल्याचे दाखवले. त्यामुळे अभियंता व दोघांनी पुन्हा टप्प्याटप्याने पैसे गुंतवले. भामट्यांनी त्यास चांगला परतावा मिळत असल्याचेही दाखवले. मात्र ज्या वेळी अभियंत्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यास पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भामट्यांकडे पैशांची मागणी केली, मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभियंत्याने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अभियंत्यासह इतर गुंतवणूकदारांसोबत संपर्क साधणारे व ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले आहेत त्या बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा ;

The post शेअर मार्केटच्या नावाने सॉफ्टवेअर इंजिनियरला ४७ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.