समृद्धी महामार्गावर सिन्नर शिवारात भीषण अपघात ; चार ठार, चार जखमी

accident,www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

समृद्धी महामार्गावर सिन्नर शिवारात रविवारी  (दि. 11) मध्यरात्री इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला असून त्यात चार जण ठार झाल्याची घटना घडली. तर चार जण जखमी आहेत.

इनोवा कार मधील प्रवासी नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबई येथे सोडून शिर्डी कडे परतत असल्याचे समजते. रविवारी (दि. 11) मध्यरात्री  बाराच्या  सुमारास  महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर किमी ५५५.८ येथे अर्थातच सिन्नर तालुक्यातील खापराळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजू कडे जाणारी इन्होवा कार (क्र MH-19 Y- 6074) हिचे वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात झाला.  अपघातात रज्जाक अहमद शेख, (५५), सत्तार शेख लाल शेख, (६५), सुलताना सत्तार शेख, (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख (४०) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.  जुबेर रज्जाक शेख, (३५), मैरूनिसा रज्जाक शेख (४५), अझर बालन शेख, (२५) मुस्कान अजर शेख (२२), हे गंभीर जखमी झाले असून सिन्नर येथे प्राथमिक उचारानंतर जखमींना तातडीने शिर्डी येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक प्रदीप मौराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी अतिशय जलद घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून ॲम्ब्युलन्सने सिन्नर येथे औषधोपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा : 

The post समृद्धी महामार्गावर सिन्नर शिवारात भीषण अपघात ; चार ठार, चार जखमी appeared first on पुढारी.