सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी योजना कार्यान्वित

नाशिक (देवळा): पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या सहकार विभागाने देशातील तसेच महाराष्ट्रातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या शंभर टक्के संगणकीकृत करून त्या थेट केंद्रीय सहकार विभागाशी जोडण्याचे अतिशय महत्वाकांक्षी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे देशभरातील लाखों विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या एकमेकांशी जोडल्या जाणार असल्याने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी, विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यास मदत करणे सुलभ होणार आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील १५ हजार विविध कार्यकारी सहकारी संस्था संगणकीकृत करून त्या केंद्रीय सहकार विभागाशी जोडून कामकाजात सहभागी होणार आहे यामुळे सहकार बळवळ मजबूत करण्यासाठी हातभार लावला जाईल. विशेष म्हणजे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ६१४ विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा समावेश करण्यात आला आहे सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील काही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या संस्थांमध्ये संगणकीकरणाचे काम सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या गावपातळीवरील ग्रामीण विकासाच्या आर्थिक नाड्या आहेत. त्यांना आर्थिक मदत करून बळकटी देण्याचे काम आत्मनिर्भर भारत या योजनेद्वारे केले जाणार आहे, तसेच गरजू शेतकरी, ठेवीदार, सभासद, कर्जदारांना तत्काळ संगणकीकृत माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याने कारभारात पारदर्शकता, सुसूत्रता, प्रष्टाचाराला आळा बसेल या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडून चार लाखांचे साहित्य पुरवले जाणार आहे यात मुख्यतः संगणक, प्रिंटर, केबल या वस्तूंचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील ६१४ संस्था या संगणकीकृत केल्या जाणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील शेकडो विविध कार्यकारी सहकारी संस्था या केंद्राच्या सहकार विभागाशी जोडल्या जाणार आहेत. ही बाब निश्चितच ग्रामीण विकासाच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. सर्व व्यवहार हे संगणकीकृत करून त्याद्वारे कारभारात पारदर्शकता आणून गरजू शेतकरी, सभासद, लघुउद्योजक यांना अल्प दरात भेट रिझव्ह बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून शेवटचा घटक असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेला मदत होईल व ग्रामीण विकासाला चालना मिळेल – कुबेर जाधव, अभ्यासक शेती व सहकार, विठेवाडी, देवळा.

तालुक्यातील संस्था अशा
चांदवड- ७८. देवळा २२ सटाणा १४ दिंडोरी ३९. इगतपुरी-१०, कळवण – १९, मालेगाव – ५२. नांदगाव ३९. नाशिक – ६४, निफाड – ११३. सिन्नर-६७, मुरगाणा १ त्र्यंबकेश्वर ६. येवला- ७१ या संस्थांचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी योजना कार्यान्वित appeared first on पुढारी.