सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण

सिडको सीसीटीव्ही pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी ऑनलाइन डेस्क
दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या जुन्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी (दि. ७) रात्री ११.४५ वाजता घडली. गुंडांनी दुचाकीवर येऊन भरवस्तीत मध्यरात्री तलवारीही सोबत आणल्याने परिसरात दहशत पसरवली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण आहे. दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले होते. तर याबाबत अंबड पोलिसांकडून पुढील शोध घेतला जात असून सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

वैभव शिर्के याच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि. ७) सकाळी किरकोळ वाद झाला होता. या वादाचे पर्यवसन टोकाला गेल्याने दर्शन दोंदे व गणेश खांदवेसह त्याच्या सहा साथीदारांनी वैभववर रविवारी (दि. ७) रात्री हा गोळीबार केला. तर वैभव शिर्केवर ३०२ चा गुन्हा दाखल असून सध्यस्थितीत तो जामिनावर सुटलेला होता.

पोलिस सुत्रांनुसार माहिती अशी की, सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता. मात्र रविवारी (दि.७) रात्री ११.३० च्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिर्के यास बोलावून घेतले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. दोंदे याने गावठी पिस्तूल काढत ते वैभववर रोखले. जीव वाचवण्यासाठी वैभवने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली. मात्र नेम चुकल्याने वैभव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळीच्या ठिकाणाची पाहणी केली.

भरवस्तीत गोळीबार झाल्याने परिसरात भितीचे वातारवरण
भरवस्तीमध्ये वर्दीळीच्या रस्त्यात रविवारी (दि.७) रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास जा हा प्रकार उघडकीस आला आहे. आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दोन टोळ्या समोरासमोर आल्या. त्यांनी आरडाओरड केल्याने तसेच मोठ्याने आवाज करणाऱ्यांच्या हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला. भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या रहिवाशी इमारतीत धाव घेत घरांचा दरवाजा लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि  घटनास्थळी पुढील पाहणी सुरू केली आहे.

The post सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.