नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर घडली. शुभम रामगोपाल पांडे (२५, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) असे या युवकाचे नाव आहे. तेजस भिकाजी राणे (२९, रा. कामटवाडे) याने पंचवटी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम हा एमएच १५ एफपी २२९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून शनिवारी (दि.८) सायंकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान, उड्डाणपुलावरून जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनचालकाने त्याच्याकडील वाहन भरदाव चालवत शुभमच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली.
या धडकेत दुचाकीवर बसलेला शुभम गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक तेजस राणे यास दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- इचलकरंजी : गांजाविक्री करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक
- Mahakal Corridor : ८५६ कोटी रुपये खर्चून बांधलेला ‘महाकाल कॉरिडॉर’ आहे तरी कसा? ; पंतप्रधानांच्या हस्ते उद्या हाेणार लोकार्पण
- मुंबई : बँकेच्या माजी मॅनेजरला 18 लाखांचा गंडा; अश्लील व्हिडीओप्रकरणी धमकी देऊन फसवणूक
The post नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.