जुन्या नाशकात आजी-माजी आमदारांमध्ये हमरीतुमरी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुन्या नाशिकमधील भद्रकाली परिसरातील घासबाजार येथील मतदान केंद्राबाहेर भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार वसंत गिते यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. यावेळी फरांदे यांच्या समर्थनार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘नरेंद्र मोदी आगे बढो’ च्या घोषणा दिल्या, तर गिते समर्थकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केल्याने परिसरात तणाव निर्माण …