मुळेगावात तीन किमी अंतरावरून महिला वाहतात डोक्यावर हंडे, 415 कुटुंबांची वणवण

त्र्यंबकेश्वर(जि.नाशिक):पुढारी वृत्तसेवा;त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने महिलांना दोन ते तीन किमी अंतरावर जाऊन डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद हे बेदखल आहेत. (Nashik Water Scarcity ) सहा वाड्यांची वस्ती असलेल्या मुळेगाव येथे आदिवासी समाजबहुल आहे. सध्या दाट लग्नतिथी असल्याने आदिवासी …

The post मुळेगावात तीन किमी अंतरावरून महिला वाहतात डोक्यावर हंडे, 415 कुटुंबांची वणवण appeared first on पुढारी.

Continue Reading मुळेगावात तीन किमी अंतरावरून महिला वाहतात डोक्यावर हंडे, 415 कुटुंबांची वणवण

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहे. पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागत आहे. टंचाईच्या परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आठवड्याभरात आढावा बैठक घेण्याचे संकेत दिले आहेत. बैठकीमध्ये टंचाई निवारणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याने जनतेच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने …

The post जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा

चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- चालू वर्षी चांदवड तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यापासूनच गावागावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊन पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. चांदवड तालुक्यातील २२ गावे व ३२ वाड्या-वस्त्यांवर टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत …

The post चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड