Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती

अत्याचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार करीत तिस गर्भवती केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात एकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु चारोस्कर (५०, रा. म्हसोबावाडी) असे या संशयिताचे नाव आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या मोलमजुरी करत असल्याने त्यांना कामासाठी बाहेर जावे लागत होते. अशा वेळी मुलगी गतीमंद असल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी राजुला सांगितले होते. मात्र राजुने याचा गैरफायदा घेत सप्टेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत मुलीवर वारंवार अत्याचार करीत तिस गर्भवती केले. पीडिता सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर तिला शारिरीक त्रास होत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजू विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती appeared first on पुढारी.