जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील जळगाव, रावेर लोकसभेमध्ये सर्वाधिक मतदान हे रावेर लोकसभेमध्ये झाले असून 45. 26 टक्के मतदान झालेले आहेत. जळगाव लोकसभेमध्ये 42.15 टक्के मतदान झालेले आहे. जळगाव मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान होताना दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान सुरळीतपणे पार पडले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ 42 .15 टक्के मतदान झाले असून जळगाव लोकसभेमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. जळगाव ग्रामीण मध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. रावेर लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये जामनेर महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या विधानसभा मतदारसंघात 41.70 टक्के मतदान झाले आहे. तर गिरीश महाजन यांनी आपल्या विधानसभातून भाजपच्या उमेदवाराला एक लाख मतदानाचा लीड मिळवून देऊ अशी घोषणा केलेली होती.
- विधानसभानिहाय टक्केवारी याप्रमाणे
- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ – 39.23 टक्के
- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 45.02 टक्के
- अमळनेर विधानसभा मतदारसंघ – 41.16 टक्के
- एरंडोल विधानसभा मतदारसंघ – 46.04 टक्के
- चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – 39.07 टक्के
- पाचोरा विधानसभा मतदारसंघ – 43.80 टक्के
- चोपडा विधानसभा मतदारसंघ – 46.16 टक्के
- रावेर विधानसभा मतदारसंघ – 48.71 टक्के
- भुसावळ विधानसभा मतदारसंघ – 43.16 टक्के
- जामनेर विधानसभा मतदारसंघ – 41.70 टक्के
- मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ – 43.10 टक्के
- मलकापूर विधानसभा मतदारसंघ – 48.67 टक्के