महायुतीत आधी तिकिटावरून आणि पाठोपाठ मानापमान नाटपावरून रंगलेली नाशिकची लढत आत्ता निर्णायक वळणावर घेऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी उमेदवार आत्मविश्वासपूर्वक जिंकण्याचे दावे करत असताना दुसरीकडे महायुतीची कमान सांभाळत राज्य नेतृत्वाने विविध समाज घटकांना आपलेसे करण्याचा धडाका लावला आहे. चौरंगी स्वरूपातील या लढतीत अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचित उमेदवार किती मजल मारतात, यावर इथल्या विजयाचे प्रमेय ठरणार आहे.
नाशिक मतदार संघात हेमंत गोडसे (महायुती), राजाभाऊ वाजे (महाविकास आघाडी), शांतिगिरी महाराज (अपक्ष) आणि करण गायकर (वंचित आघाडी) हे प्रमुख उमेदचार नशीच आजमावत आहेत. वाजे यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचाराची एक फेरी केव्हाच पूर्ण केली. त्यांच्या उमेदवारीवरून फारशी नाराजी नसल्याने आघाडीतील तीनही घटकपक्ष जोरकसपणे त्यांच्या प्रचारात उतरले आहेत, तथापि, महायुतीचे गोडसे यांच्याबाबत स्वपक्षासह (शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात पहिल्यापासून नाराजी असल्याने ती दूर करण्यात स्वतः गोडसे यांच्यासह तीनही पक्षाच्या राज्य नेतृत्वाला ऊर्जा खर्च करावी लागत आहे.
तब्बल दोन लाखांहून अधिक भक्त परिवार असल्याचा दावा करणाऱ्या महंत शांतिगिरी महाराज यांनी राष्ट्रभक्तीसाठी उमेदवारी दाखल केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष लागून राहिले आहे. राजकारण्यांना दूर सारत यावेळी मतदार धर्मसत्तेला कौल देतील, असा विश्वास महाराजांच्या समर्थकांकरवी व्यक्त करण्यात येत आहे. भक्त परिवाराने एकगठ्ठा मते पदरात टाकली, तर दोन प्रमुख उमेदवारांच्या जय पराजयाचे गणित बिघडू शकते. निवडणूक रिंगणात उत्तरलेल्या वंचितच्या गायकर यांनीही मराठा दलित असा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यावेळी यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या मतदार संघात सर्वाधिक मतदान मराठा समाजाचे असून, दलित मतदारांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे.
मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल
नाशिकमध्ये प्रतिष्ठा पणाला लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षीय उमेदवार हमत गोडसे यांना उमेदवारी मिळवली, गोडसे यांना ज्यांचा कोणाचा विरोध होता, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून, भेटी घेऊन गोडसेविरोध मावळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले. तीन दिवसांत दोन वेळा नाशिकला येऊन त्यांनी आधी स्वकीयांची मोट बांधली, तर पाठोपाठ समाजातील विविध पटकांना आश्वस्त करून नाशिकसाठी काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा मेळाव्यात शब्द दिला.
हेही वाचा: