आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

Nashik Dist pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारी घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडलेला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, संजय तटकरे आणि मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात २००४ ते २००९ मधे राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे तर २००९ ते २०१४ पर्यंत मधे समीर भुजबळ खासदार होते. सध्या नाशिक लोकसभेत राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम आहे. असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: