
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरात कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. छगन भुजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.


मतदान केंद्र, मनपा शाळा क्र.१४,१५ मखमलाबाद येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सहपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. (छाया : आसिफ सय्यद)
