नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना समाजमाध्यमावरून धमकी देणाऱ्या तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:च्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर धमकीची पोस्ट शेअर करीत आ. फरांदे यांना धमकी दिल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर फरांदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
जयेश मन्साराम माळी (रा. वृंदावननगर, आडगाव, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ‘संशयित आरोपी साहिल शाबिर शेख (२१, रा. भारतनगर झोपडपट्टी, वडाळा रोड, नाशिक) हा खासगी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहे. शेख याने त्याच्या स्वत:च्या प्रोफाइलवर धमकीवजा पोस्ट तसेच दोन समाजांत तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर करीत, आ. फरांदे यांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आॅडिओ क्लिप प्रसारित केली होती. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, संशयित साहिल शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कोरबू करीत आहेत.
हेही वाचा –