सकाळी ११ पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

Lok Sabha Elections 2024

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह अपडेटसाठी आमच्या सोबत रहा…..
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली असून ज्येष्ठ मतदारांनी सकाळ सत्रात मतदानाला पसंती दिल्याचे समोर येत आहे. तर घड्याळाचा काटा पुढे सरकत असतांना सकाळी ११ पर्यंत मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये नवमतदारांचा ओढा दिसून येत आहे. नाशिक मतदार संघात सकाळी ११ पर्यंत 19.5 टक्के तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात 18.09 टक्के मतदान झाले असून चांदवड विधानसभा मतदारसंघात 20.88 टक्के मतदान झाले आहे.

बागलाण – 18.25 टक्के
धुळे शहर – 16.21 टक्के
धुळे ग्रामीण – 20.12 टक्के
मालेगाव मध्ये – 19 टक्के
मालेगाव बाह्य – 13 टक्के
सिंधखेडा – 17.87 टक्के

धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 17.38 टक्के मतदान झाले आहे.

देवळा ; येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला (छाया : सोमनाथ जगताप)
देवळा ; सुभाष नगर येथे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी मतदानाचा हक्क बजावला (छाया ; सोमनाथ जगताप)