उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

माजी महापौर दशरथ पाटील www.pudhari.news

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून नाशिकच्या रणांगणात कोण उतरत? उमेदवारीसाठी नवनवीन नावे समोर येत होती. तर विविध राजकीय पक्षाकडून नवीन राजकीय नाट्यात रंगत येत होती. त्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून फोन येत होते. मात्र या निवडणुकीच्या मैदानातून पाटील यांनी माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबईतून आलेल्या एका फोनमुळे गुरूवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केला होता. शुक्रवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा ‘त्या’ व्यक्तीचा फोन येणार असल्याने त्यानंतर पाटील आपली भूमिका जाहीर करणार होते. त्यानुसार त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.

कॉल करणारी व्यक्ती जुन्या पक्षाशी संबधित असल्याचे सांगितले जात असून शरणपूर रोड येथील त्यांच्या कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीकरता आपण इच्छुक होतो. निवडणूकीची तयारी म्हणून मतदारांसोबत भेटीगाठी तसेच विकास कामांबद्दल बोलत होतो. या प्रचारादरम्यान अनेकांनी लोकसभेच्या ऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केल्याने शहराचा विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याने लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा: