डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलाचा मृत्यू

चुकीचे इंजेक्शन दिल्याने मृत्यूwww.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- डॉ. नितीन फरगडे (रा. संजीवनगर, अंबड) असे उपचार करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१९ मध्ये ज्युपीटर रुग्णालयात घडला आहे. अखिलेश शर्मा (४१, रा. अंबड सातपूर लिंकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अमन शर्मा (१०) हा आजारी होता. ताप आल्याने अमनला डॉ. फरगडे यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. तेथे फरगडे यांनी उपचार केले. यानंतर औषधे संपल्याने अखिलेश हे मुलगा अमन यास पुन्हा नितीन फरगडेकडे उपचारासाठी घेऊन गेले. तेव्हा फरगडे हे इतर रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना फोन आला. फोनवर बोलताना नितीन यांनी दुसऱ्या रुग्णास देण्यासाठी तयार केलेले इंजेक्शन अमनला दिले. त्यामुळे अमनची तेथेच तब्येत ढासाळली. फरगडे यांनी उपचार करीत अमनला सलाईल लावली. तसेच काही टेस्ट केल्या. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अमनला ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अमनचा मृत्यू झाला.

न्यायालयाने घेतली दखल

अमनचे वडील अखिलेश यांनी डॉ. फरगडे विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने प्रकरण जाणून घेत डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबड पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचा :

The post डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.