नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा

मणिपूरला पोहोचला नाशिकचा कांदा,www.pudhari.news

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सध्या हिंसाचारानेे पोळून निघालेल्या मणिपूरला मनमाडचा कांदा पोहोचला आहे. अंकाई रेल्वेस्थानकातून 22 रेकच्या मालगाडीद्वारे सुमारे 800 टन कांदा मणिपूरला पोहोचला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराने धुमसत आहे. हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. हिंसाचारामुळे जीवनावाश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने तेथील नागरिकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. मणिपूरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून जीवनावश्यक वस्तू मणिपूरला पाठविल्या जात आहेत. मनमाडच्या अंकाई रेल्वेस्थानकातून मालगाडीद्वारे 800 टन कांदा पाठविण्यात आला असून, तब्बल 2801 किमी अंतर कापून 22 रेकची मालगाडी मणिपूरच्या खोंगसोंग येथे पोहोचली आहे. तेथे कडक सुरक्षेत कांदा उतरविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा appeared first on पुढारी.