नाशिक : लासलगावला महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महावीर जयंती pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांची जन्मकल्याणक उत्सव रविवारी लासलगाव शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आली. महावीर जयंती उत्सव समिती व सकल जैन बांधवांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विहार सेवार्थी विशाल चांदर,सागर शिंदे, भाऊसाहेब भिलोरे, भास्कर गारे, उत्तम शिंदे, म्हसू भोसले, भागवत नागरे, महंत ज्ञानेश्वरनंदजी महाराज, भाऊसाहेब दुगड, रवी साताळकर, रामचंद्र जगदाळे, खंडेराव कांबळे, शरद ठोके, गांगुर्डे सर, बाळू गोरडे, प्रकाश निहारकर, अरुण पुंड, बाजीराव खैरे, प्रेममुनी बाबा, तानाजी खैरे, सचिन खैरे, आनंद काळे, कदम गुरुजी, दादा अहिरे, योगेश गुंजाळ, नीरज भट्टड,सुनील मालपाणी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

येथील जैन मंदिरापासून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल सुशोभित अश्वरथात तेजस भंडारी, दर्शन लुनावत या लहाणग्याने भगवान महावीर यांची वेशभूषा साकारली होती. तर रिद्धी खिवसंरा, रियांश नाहटा ,प्रणिता जैन यांनी विविध वेशभूषा साकारल्या. जैन महिला सोशल ग्रुप, लुक अँड लर्ण यांनी विविध स्पर्धा आणि सजीव देखावे यांचे आयोजन केले होते. यावेळी सवाद्य,लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली. अहिंसा परमोधर्म की जय, वंदे विरम ,भगवान महावीर स्वामी की जय’, अशा आवेशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाजातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, विहार सेवार्थी यांचा सन्मान, रक्तदान शिबिर आणि डॉ जितेंद्र बोरा यांचे ब्रेन डेव्हलपिंग सेमिनाराचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, जयदत्त होळकर, जि. प. माजी सदस्य डी. के. नाना जगताप, सुवर्णा जगताप,शिवा सुरासे,गुणवंत होळकर,प्रकाश दायमा,संतोष पलोड, शंतनू पाटील,डॉ युवराज पाटील,डॉ विलास कांगणे,संतोष पानगव्हाणे,सकल जैन बांधव, महिला या शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामी जन्मकल्याण समिती तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा: