नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार शहरात नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांसह जुन्या अधिकाऱ्यांची सांगड घालत नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखेत पोलिसांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिस ठाण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले अशोक गिरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर मुंबई नाकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांची विशेष शाखेत बदली केली आहे. पुणे येथून आलेले जयराम पायगुडे यांना अंमली पदार्थ विरोधी व खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली. पंचवटीचे मधुकर कड यांच्याकडे शहर गुन्हे शाखा युनिट एकची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. शहरात आत्तापर्यंत पाच पोलीस निरीक्षक रुजू झाले असून अद्याप पाच अधिकारी हजर झालेले नाहीत. तसेच परजिल्ह्यातून आलेल्या ११ पोलीस उपनिरीक्षकांची आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

यांची खांदेपालट
नियंत्रण कक्षातील रणजित नलावडे यांची उपनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध निरीक्षकपदी, वेल्फेअरचे इरफान शेख यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर निरीक्षक सारिका औताडे यांच्याकडे प्रशिक्षण शाखेसह वेल्फेअरची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

असे आहेत बदल…
पोलीस निरीक्षक                    नियुक्तीचे ठिकाण
जयराम पायगुडे                     अंमलीपदार्थविरोधी व खंडणीविरोधी पथक
बडेसाह नाईकवाडे                 नाशिकरोड पोलीस ठाणे, गुन्हेशोध
जगन्नाथ जानकर                    सरकारवाडा पोलीस ठाणे, गुन्हेशोध
अंकुश चिंतामण                     विशेष शाखा
अशोक गिरी                          मुंबई नाका पोलीस ठाणे, प्रभारी
बापू रायकर                          पंचवटी पोलीस ठाणे (सहायक निरीक्षक)

The post नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट appeared first on पुढारी.