मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन सभा

मनोज जरांगे Maratha Maratha Reservation ProtestProtestपाटील

नाशिक| सिडको पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत असलेल्या मनोज जरांगे-पाटील मंगळवारी आणि बुधवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. या सभांना सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या सभेसाठी असलेली सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनोज जरांगे-पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन सभा होत आहेत. यातील पहिली सभा त्र्यंबकेश्वर येथे रात्री आठ वाजता होणार आहे. त्यानंतर दुसरी सभा इगतपुरी तालुक्यातील शेणीत फाटा येथे सकाळी नऊ वाजता, तर पुढची सभा लगेचच सकाळी अकरा वाजता विश्रामगड सिन्नर येथे होणार आहे. या सभांना हजारोंची गर्दी होणार असल्याने त्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.

सिडकोतील त्रिमूर्ती चौकात रंगणार सोहळा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील येत्या बुधवारी (दि. 22) नाशिक दौऱ्यावर येत असून, सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सकाळी सात वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच सकल मराठा समाजातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

जरांगे-पाटील यांच्या स्वागत सोहळ्याची रूपरेषा ठरवण्यासाठी सिडकोच्या सावतानगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. मराठा समाजास आरक्षण मिळावे, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. त्यांनी उभारलेल्या लढ्यामुळे त्यांचे स्वागत करणे क्रमप्राप्त आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे बडगुजर यांनी नमूद केले.

बैठकीस उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, विधानसभा प्रमुख सुभाष गायधनी, उपमहानगरप्रमुख सचिन राणे, नीलेश साळुंखे, सुनील पाटील, नाना पाटील, संजय भामरे, विभागप्रमुख बंडू दळवी, प्रदीप पठाडे, सुनील एकमोडे, पवन मटाले, भूषण भामरे, राहुल पाटील, पंकज जाधव, अजित काकडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन सभा appeared first on पुढारी.