नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी वारकऱ्यांच्या रांगा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा– पौषवारीनिमित्त आलेल्या लाखो वारकऱ्यांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे पुण्य प्राप्त केले. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी सकाळपासून वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Brahmagiri Nashik) वारकरी संप्रदायात ब्रह्मगिरी पर्वताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांना योगिराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांनी धाकटे बंधू ज्ञानेश्वर माउलींना गुरुप्रसाद दिला. आदिनाथांपासून आलेली गुरुपरंपरा …

The post नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी वारकऱ्यांच्या रांगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी वारकऱ्यांच्या रांगा

त्र्यंबकनगरीत निवृत्तीनाथांच्या पौषवारीला सुरुवात

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा – खांद्यावर भगवी पताका… मुखी हरिनामाचा घोष अन‌् टाळ-मृदंगाच्या गजराने अवघी त्र्यंबकनरी दुमदुमली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गत महिनाभरापासून निघालेल्या दिंड्या त्र्यंबकनगरीत दाखल झाल्या आसून आजपासून निवृत्तीनाथांच्या पौषवारीला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त त्र्यंबकेश्वरनगरी वारकऱ्यांनी गजबजली आहे. ( Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024) श्री संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारी यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील समाधीस्थळ …

The post त्र्यंबकनगरीत निवृत्तीनाथांच्या पौषवारीला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरीत निवृत्तीनाथांच्या पौषवारीला सुरुवात

Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली…

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा संत निवृत्तिनाथ संजवीन समाधी दर्शनाच्या ओढीने आलेले वारकरी गुरुवारी सकाळी काल्याचे कीर्तन आटोपताच मिळेल त्या साधनाने परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे सोमवार ते बुधवार लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली आहे. गत आठवडाभरा त्र्यंबकेश्वरनगरी भाविकांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. मात्र, आता भाविक भरतीच्या मार्गाला लागल्याने शहरात शांतता दिसत आहे. दरम्यान, भाविकांचा …

The post Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली…

त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा पौषवारीमुळे ञ्यंबकनगरी हरिनामाने दुमदुमली आहे. काल सायंकाळपर्यंत 500 पेक्षा जास्त दिंडया शहरात दाखल झाल्या होत्या. यावर्षी प्रत्येक दिंडीत वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. दिंडया मुक्कामाच्या जागी थेट डोंगरावर पोहाचत आहेत. ञ्यंबक नगरपालिका प्रत्येक दिंडीस पाण्याचा टँकर मागणीप्रमाणे पाठवत आहे. मात्र दिंडी थांबलेल्या ठिकाणावर जाण्यास रस्ता मिळणे दुरापास्त …

The post त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी येत्या 18 जानेवारीच्या पौषवारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक दिंड्या नाशिकच्या वेशीवर पोहोचल्या असून, त्र्यंबकनगरीकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे त्र्यंबककडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या यात्रा बंद पडल्या …

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल

Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील पौषवारीकरिता (Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar) प्रस्थान करणाऱ्या पायी दिंड्यांना शहर परिसरात गायन-वादन आणि भजनास अटकाव करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा तोंडी फतवाच काढल्याने संत निवृत्तिनाथ महाराज ट्रस्ट व त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. वारकऱ्यांच्या भावना दुखावू नका. दिंड्यांच्या मार्गात अडथळे आणू नका, असा इशारा देताच जिल्हाधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत …

The post Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई appeared first on पुढारी.

Continue Reading Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई