Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक : गोडसे, डाॅ. पवार, चव्हाण, गायकर यांनी भरले नामनिर्देशन पत्र

अर्ज pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत गुरुवारी (दि. २) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिकमधून महायुतीचे हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून डाॅ. भारती पवार या प्रमुख उमेदवारांसह एकूण २० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी महायुतीच्या उमेदवारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, भाजप नेते गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

महायुतीच्या जागावाटपात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिकमध्ये अखेरच्या वेळी शिवसेनेचे गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानुसार गोडसे व डॉ. पवारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले. याशिवाय नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीदेखील दिंडोरीतून उमेदवारी अर्ज भरल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

उमेदवारी अर्जासोबत विक्रीदेखील सुरूच आहे. नाशिकमधून ४ इच्छुकांनी ४ अर्जांची खरेदी केली. तसेच दिंडोरीतून १४ उमेदवारांनी २२ अर्ज घेतले. उमेदवारी अर्जासाठी होणारे शक्तिप्रदर्शन लक्षात घेता पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी (दि.३) दुपारी तीनपर्यंतची अंतिम मुदत आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी कोण-कोण अर्ज भरणार यावरून साऱ्यांमध्येच उत्सुकता आहे. दरम्यान, शनिवारी (दि.४) दाखल अर्जांची छाननी केली जाईल. तर ६ मे रोजी दुपारी ३ पर्यंत माघारीची मुदत असणार आहे.

गुरुवारी दाखल अर्ज असे…
दिंडोरी :
डॉ. भारती पवार, भास्कर भगरे, बाबू भगरे, शिवाजी बर्डे, भास्कर भगरे, हरिश्चंद्र चव्हाण, भारत पवार

नाशिक : हेमंत गोडसे, भक्ती गोडसे, जितेंद्र भावे, कैलास चव्हाण, कांतीलाल जाधव, निवृत्ती अरिंगळे, दर्शना मेढे, करण गायकर, झुंजार आव्हाड, प्रकाश कनोजे, धनाजी टोपले, सुधीर देशमुख, जयश्री पाटील.

आजपर्यंत एकूण दाखल अर्ज
नाशिक :
हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतिगिरी महाराज, जयश्री पाटील, देवीदास सरकटे, कमलाकर गायकवाड, सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, जितेंद्र भावे, कैलास चव्हाण, कांतीलाल जाधव, निवृत्ती अरिंगळे, दर्शना मेढे, करण गायकर, झुंजार आव्हाड, प्रकाश कनोजे, भक्ती गोडसे, धनाजी टोपले, सुधीर देशमुख.

दिंडोरी : डॉ. भारती पवार, भास्कर भगरे, जे. पी. गावित, सुभाष चाैधरी, शिवाजी बर्डे, पल्लवी भगरे, बाबू भगरे, हरिशचंद्र चव्हाण, भारत पवार.

हेही वाचा :