Murder : उधारीच्या पैशांवरुन मित्रानेच केला घात, खून करुन मृतदेह कन्नड घाटात फेकला

खून

जळगाव : उधार घेतलेले ५ हजार रूपये परत देण्याच्या वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह दरीत फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आज (दि. १) औरंगाबादच्या दोघांना अटक केली आहे. मधुकर रामदास बुटाले (वय ४५, रा. औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी कन्नड घाटातील खोल दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. सहायक पोलिस निरीक्षक हर्षा जाधव यांनी तपास करुन मयताची ओळख पटवली. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे चाळीसगाव पोलिसांनी ३० सप्टेंबरला मृताचा मेहुणा गोपाल शंकर पंडीत (वय ३२) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले (वय २५, दोन्ही रा. औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले होते.

पिंपरी : ओला कचरा समस्या अभियान तिसऱ्या टप्प्यात

रिक्षात गळा दाबून केली हत्या…
सुरवातीला गोपाल पंडीत याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पोलीसांनी विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. २७ सप्टेंबर रोजी दोन्ही संशयित आरोपी हे मयतासोबत औरंगाबाद रामगिरी हॉटेल येथून गोपाल पंडीत याची रिक्षा (एमएच २०, ईएफ- ७९८४) हिचेत बसून सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात होते. यावेळेस ५ हजार रुपये उधार देण्याच्या वादावरुन कृष्णा भोसले व मयत मधूकर बुटाले यांचे चिखलठाणा पोस्टे हद्दीत वरुड गावाजवळ रिक्षातच भांडण झाले. यानंतर कृष्णा भोसले याने मयत मधूकर बुटाले याचा गळा दाबून खून केला. यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून त्याचे मृतदेह रिक्षाने औरंगाबाद येथून कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्टजवळ दरीत फेकून दिला. दोन्ही आरोपी हे चाळीसगाव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात असून त्यांचेविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post Murder : उधारीच्या पैशांवरुन मित्रानेच केला घात, खून करुन मृतदेह कन्नड घाटात फेकला appeared first on पुढारी.