Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

One Nation One Election : आता एक देश-एक मतदार यादीची तयारी! रामनाथ कोविंद समितीच ठरविणार पद्धत, विधी व निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यवाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्य शासनाने सोमवारी (दि. २२) सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय याद्यांची प्रसिद्धी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. 23) प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त याद्या तयार करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २२ जानेवारीला अंतिम याद्या प्रसिद्ध होणार होत्या. परंतु, राज्य शासनाने श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशांनुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी (दि. २३) अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे डॉ. मंगरुळे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

The post Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.