नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मंगळवार (दि.२) मुंबईतील तापमान वाढलं असून राजकीय घडामोडींनी वळण घेतलं आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील आपला यवतमाळचा दौरा अर्धवट सोडूनच मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत.
यवतमाळचा दौरा रद्द करत दादा भुसे मुंबईला रवाना झाले आहेत. हेमंत गोडसे, छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे देखील मुंबईला रवाना झाले आहेत. दादा भुसे यांचा मंगळवार (दि.२) यवतमाळ दौरा होता. मात्र हा दौरा रद्द करून ते तातडीने मुंबईकडे निघाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव आणि जागेचा तिढा वाढता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे देखील मंगळवार (दि.२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर हेमंत गोडसे यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्तास तरी उमेदवारी निश्चितीनंतरच गोडसे त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत.
हेही वाचा:
- नागपुरात प्रचार जोरात, ठाकरे पवारांच्या भेटीला, फडणवीस गडकरींच्या मदतीला
- नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत | Nashik Lok Sabha Election 2024
- Lok Sabha Election 2024 : जाहीर सभांसाठी मैदानांची होणार ऑनलाईन बुकिंगउमेदवार व कार्यकर्त्यांची आता दमछाक थांबणार
The post नाशिकसाठी गोडसे, भुजबळांच्या पाठोपाठ भुसे देखील मुंबईला रवाना appeared first on पुढारी.