कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

आमदार नितेश राणे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का? इतरांना नाही का? ज्याप्रमाणे हिंदू धर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मीयांनीसुद्धा पाळावे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

आमदार नितेश राणे हे नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

अनधिकृत भोंगे मोठ्या प्रमाणात वाजत आहेत. मात्र, त्याकडे पोलिस दुर्लक्ष करतात. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. कायदे हे सर्वांसाठी आहे. त्यामुळे सर्वांनी कायद्याचे नियम पाळलेच पाहिजे, अन्यथा आम्हाला जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा देऊन आमदार राणे म्हणाले की, सभागृहात मी भद्रकालीचा विषय घेतला. त्या ठिकाणी रात्री-बेरात्री रेस्टॉरंट, बार चालवले जातात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अतिक्रमणाबाबत कारवाई करणार नसाल तर ज्या खुर्चीवर अधिकारी आहे, त्यांच्या बाबतीत मला बोलावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे, मात्र इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आरक्षण दिले जाईल. राम मंदिराबाबत उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे. राम मंदिराबाबत खासदार संजय राऊत यांनी लेख लिहिला होता, असे ते म्हणाले.

कुठलाही प्रश्न मांडू शकतो

नाशिकचा प्रश्न विधिमंडळात मांडला. मी विधिमंडळाचा सदस्य आहे. महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न विधिमंडळात मांडू शकतो. माझा मतदारसंघ हा काही पाकिस्तानमध्ये नाही, असेही राणे म्हणाले.

हेही वाचा :

 

The post कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का? appeared first on पुढारी.