लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

जिल्हाधिकारी जलज शर्मा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील वयस्कर मतदारांना घरबसल्या टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने अशा ज्येष्ठ नागरिकांचा आताच शोध घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. (Lok Sabha elections 2024)

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१६) नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा पार पडला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतलेल्या बैठकीप्रसंगी सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, दिव्यांग मतदारांच्या धर्तीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांचे काम वाढले आहे. परिणामी, आतापासून अशा मतदारांना शोध घेत मतदानाच्या दिवशी त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, अशा सूचना केल्या. (Lok Sabha elections 2024)

निवडणूक कार्यक्रमावेळी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. निवडणूक घोषित होताच राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे काढण्यात यावे, कंट्रोलरूम व सर्व पथके कार्यान्वित करावे. तसेच व्हिडिओग्राफर्स पथके, खर्च निरीक्षक पथके तैनात करताना राजकीय पक्षांच्या रॅली व खर्चावर लक्ष ठेवावे, असे निर्देशही शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले. (Lok Sabha elections 2024)

सूक्ष्म नियोजन करावे : शर्मा
लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यापासून ते मतदान व मतमोजणीच्या दिनापर्यंत सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश जलज शर्मा यांनी दिले. ईव्हीएम, मतदारयादी तयारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्ट्राॅंगरूम, साहित्य वितरण, मतदानानंतर ईव्हीएम केंद्रीय वेअर हाउसमध्ये सुरक्षितपणे जमा करणे आदींबाबत शर्मा यांनी सविस्तर आढावा घेतला.

हेही वाचा:

The post लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश appeared first on पुढारी.