बूट, पायमोज्यांसाठी अनुदान प्राप्त होऊनही विद्यार्थी वंचितच
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना एकजोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे यासाठी १७० रुपये प्राप्त होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार ९९९ विद्यार्थ्यांसाठी चार कोटी ५५ लाख ५९ हजार रुपयांचा निधी वर्ग झाला असला, तरी आठ दिवस उलटूनही विद्यार्थी या पूर्ण गणवेशापासून वंचित आहेत. २०२४- २५ या शैक्षणिक …