लोकसभा निवडणूक : शांतिगिरींना बादली, गायकरांना सिलिंडर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रीया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. नाशिकमधून अपक्ष लढत देणारे शांतीगिरी महाराज यांना बादली हे चिन्ह मिळाले असून वंचितचे करण गायकर यांना गॅस सिलिंडर चिन्ह मिळाले. लोकसभा निवडणूकीत महत्वपूर्ण टप्पा असलेल्या माघारीची प्रक्रीया निर्विघ्नपणे पार पडली. नाशिकमधून …

Continue Reading लोकसभा निवडणूक : शांतिगिरींना बादली, गायकरांना सिलिंडर

हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क भाजप पदाधिकारी यांनी घेतलेल्या मध्यस्थीला यश आले असून दिंडोरीमधून इच्छुक असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीतून अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात …

Continue Reading हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून नाशिकच्या रणांगणात कोण उतरत? उमेदवारीसाठी नवनवीन नावे समोर येत होती. तर विविध राजकीय पक्षाकडून नवीन राजकीय नाट्यात रंगत येत होती. त्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून फोन येत होते. मात्र या निवडणुकीच्या मैदानातून पाटील यांनी माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले आहे. नाशिक लोकसभा …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबईतून आलेल्या एका फोनमुळे गुरूवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केला आहे. शुक्रवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा ‘त्या’ व्यक्तीचा फोन येणार असल्याने त्यानंतर पाटील आपली भूमिका जाहीर करणार …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा

नााशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकीचा जोर उत्तरोत्तर वाढत असला तरी, महायुतीच्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स नाशिककरांची उत्कंठा वाढविणारा ठरत आहे. दररोज नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत येत असले तरी, उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न कायम आहे. या नावांमधील बरीच नावे बळजबरीनेच पुढे केली जात असल्याने, लोकसभा निवडणूकीसाठी तो उमेदवार खरोखरच सक्षम आहे काय? असा …

The post महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा appeared first on पुढारी.

Continue Reading महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा

स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिकांमध्ये निवडणूकविषयक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे. २०१९च्या निवडणुकीवेळी साधारणपणे १०० हून अधिक केंद्रांवर मतदान कमी झाले होते. त्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जनजागृती मोहिमेमध्ये जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये यांमध्ये मतदारदूत निवड, पथनाट्य, …

The post स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम

उमेदवारी कोणाला : भुजबळ की गोडसे, उत्सुकता शिगेला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या जागेवरून महायुतीतील संघर्ष टोकाला गेला असून, उमेदवारीचा निर्णय आणखी दोन-तीन दिवस लांबण्याची शक्यता आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी (दि. 2) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर गोडसेंपाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन …

The post उमेदवारी कोणाला : भुजबळ की गोडसे, उत्सुकता शिगेला appeared first on पुढारी.

Continue Reading उमेदवारी कोणाला : भुजबळ की गोडसे, उत्सुकता शिगेला

छगन भुजबळांच्या नावाची लवकरच घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, नाशिक, धाराशिवची जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आली असल्याचे वृत्त आहे. नाशिकमधून छगन भुजबळ, तर धाराशिव मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) असा संघर्ष सुरू …

The post छगन भुजबळांच्या नावाची लवकरच घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांच्या नावाची लवकरच घोषणा

तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत नाशिकच्या जागेचा गुंता सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी (दि. ३१) तर महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्याने, गुंता आणखीनच वाढला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने आपला उमेदवार देऊन उमेदवार निवडीत महायुतीवर काहीशी सरशी घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नाशिक …

The post तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना appeared first on पुढारी.

Continue Reading तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना

हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड

नाशिक: पुढारी वृत्तसेवा सलग दोन निवडणुकांत चढ्या मताधिक्क्याने विजयश्री प्राप्त करणाऱ्या नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा तिसऱ्यांदा तिकिटासाठीचा लढा राजकीय उष्मा निर्माण करीत आहे. महायुतीच्या वर्चस्वाची गाथा सांगणाऱ्या या मतदारसंघात गोडसेंना मोठ्या भावाचे बिरुद मिरवणारा भाजपच अपशकून करण्यास धजावल्याने थेट मतदानापर्यंत एकोपा राहणार का, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. हीच अस्वस्थता ऐन शिमगादिनी …

The post हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड